देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी,
तेणे मुक्ती चारी साधियेल्या.
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी.

श्वासांत विठ्ठल, देहात विठ्ठल
स्नेहात विठ्ठल, ओथंबला

डोळ्यांत विठ्ठल, आशेत विठ्ठल
हृदयात विठ्ठल, ओसंडला

मेघांत विठ्ठल, भूमीत विठ्ठल
जीवांत विठ्ठल, बा सावळा

बोलतो विठ्ठल, पाहतो विठ्ठल
हा देखणा सोहळा

तोच माय, तोच बाप विठुराया, पंढरीचा

आलो भेटीला सख्या श्रीरंगा, रे विठ्ठला

रूप पाहतां लोचनी,
सुख जाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा,
तो हा माधव बरवा

विठुनामाचा गजर
डोईवरी ती तुळस
पंढरीचा रे कळस
पाहता हर्ष डोळ्यांतूनी दाटला

वारी माझ्या विठ्ठलाची
जन्मजन्माच्या सुखाची
जगण्याच्या रिंगणाची
पांडुरंगी असा जीव रे रंगला

पाऊल बाळाचे धावते मातेसी
तैसे विठूपासी जाणे आम्हां

सागरा शेवटी जैसी नदी जाय
तैसे विठूमय होणे आम्हां

सांगतो विठ्ठल, ऐकतो विठ्ठल
हा देखणा सोहळा

तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा
आलो भेटीला सख्या श्रीरंगा रे विठ्ठला

रूप पाहतां लोचनी,
सुख जाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा

Sample comments about this video

"रिंकू अभिनय अतिशय सुरेख आणि गीत सुद्धा तितकच भावपूर्ण आणि त्यात अजय गोगावले सरांचा आवाज 😇🌸👌"

"अजय सरांचा आवाज आणी रिंकूचा अभिनय, डोळ्यात पाणी आल, खूप खूप सुंदर आहे,, परत परत ऐकावं अस,, रिंकूचा अभिनय एकच नंबर आहे"

"शेवटी मराठी ते मराठीच आहे........ अंगावर काटा आलाच पाहिजे....... कारण अजय सर अतुल सर हे दोन मराठीचे रत्न गाणं बनवतात त्यावेळी ते हलक्यात नसतं आणि त्यांना साथ देणारी टीम 🙇🙇....... आणि त्यात भक्ती गीत....🙌🔥🔥🔥🔥"

"पद्मनाभ यांचं संगीत आणि अजय दादाच आवाज म्हणजे साक्षात पांडुरंग समोर उभा राहिला"

"अफलातून गीत अजय गोगावल्यांचा स्वर रिंकूचा उत्कृष्ट अभिनय आणि पद्मानाभचे सुंदर संगीत आणि आपली विठू माऊली सर्वच उत्कृष्ट. रेकॉर्डब्रेक गीत जबरदस्त सलाम सर्वाना. 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹"

"अंगावर काटा आननारा अजय सरांचा आवाज . डोळ्यात पाणी आननारा रिंकु चा अभिनय आणि डोळ्यांचे पारणे फेडनारी माझ्या सावळ्या विठ्ठलाची वारी अप्रतिम तालमेल 🔥 जबरदस्त song आहे ❤"

"✨रिंकूच्या भावपूर्ण अभिनयामुळे प्रत्येक प्रसंग हृदयाला स्पर्श करून जातो, तर अजय गोगावले यांच्या सुरेल आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. अभिनय, संगीत आणि भावना यांचा सुंदर संगम असलेलं हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. दोघांनाही मनःपूर्वक सलाम! 👏🌹✨"

"All Vitthal lovers use this song for Vitthal Rukmini Status best ever song.....all about this song speechless 😢 Ram Krishna Hari"

"पद्मनाभ गायकवाड खूप खूप अभिनंदन छान संगीत दिलं आहे, तरुण संगीतकार म्हणून भविष्यात तुझ्याकडून अशाच छान छान गाण्यांची अपेक्षा आहे. गाण्याचे शब्द जेवढे साधे आहेत तेवढेच प्रभावी आहेत, कोणालाही सहज समजतील असे आहेत, ऋषिकेश विदार खूप छान लिहिलं आहे गाणं. अजय गोगावले यांनी नेहमीप्रमाणे उत्कृष्ट गाऊन मन जिंकलं आहे. गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ मस्त झाला आहे, खास करून 0.36 ते 0.37 च्या दरम्यान. रिंकू राजगुरू च्या चेहऱ्यावरचे हावभाव केवळ अप्रतिम. गाण्याच्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन. राम कृष्ण हरी 🙏😊"

"आषाढी एकादशी जवळ आली, मन पंढरीच्या वाटेला निघालं... आणि सोबत अजय-अतुलचं हे अप्रतिम गाणं. ❤️🎶"